Mumbai Application

अकरावी अर्ज सुविधा पध्दती २००८-२००९

अर्ज सुविधा पध्दती : प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालये , मुंबई मध्ये अापले स्वागत असो!

  • पार्श्वभूमि
  • प्रेरणा
  • प्रस्तावित अर्ज सुविधा पध्दती
  • पध्दतीचे उपयोग
  • जोखिम व धोके
  • अस्वीकृती
  • अर्जासाठी सुचना

पार्श्वभूमि : महाराष्ट्र सरकारने यंदाचे वर्ष 'माहिती-तंत्रज्ञान ' वर्ष म्हणुन घोषित केले अाहे.याचाच एक भाग म्हणुन सरकार तंत्रज्ञानाचे फायदे जनतेपर्यंत नेऊ ईच्छिते.माध्यमिक शालांत परिक्षेनंतरची,प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील ही एकच,सर्वांत मोठी प्रवेश प्रक्रिया आहे.
प्रेरणा: मुंबई येथे जुन,जुलै मध्ये पावसाळा असतो.माध्यमिक शालांत परिक्षेच्या निकालानतंर,थोडक्या कालावधीत,असंख्य महाविद्यालयांत व्यक्तीश: जाणे,तेथिल अतिंम तारखा पाळणे इ. सर्व अत्यंत जिकरीचे काम असते.अशा वेळी माहिती-तंत्रज्ञानाच्या मदतीने ,नुकत्याच एसीसी उत्तीर्ण झालेल्या प्रगतीपथावरील विद्यार्थाचे मानसिक दडपण हलके करता येईल असे वाटले. प्रवेशच्छुक विद्यार्थांची दैना खरोखरच काळजाचा ठाव घेते.त्यांना भाऊ,बहिण,भाचे,पुतणे,वडील,शेजारी इ. सर्वांना अर्ज मिळवण्यासाठीं वेगवेगळ्या रांगात उभे करावे लागते.कधी कधी दलालांचे उखळे पांढरे होते.वेळेच्या अात पोहचण्यासाठी टॅक्सी,रीक्षा इ. वाहनांवर खर्च होतो.झेरॅक्स प्रती हरवणे,कागदपत्रे भिजणे,निवड यादीतील सर्व महाविद्यालयात जाता न येणे,या सर्व नेहमीच्या गोष्टी होतात.ही परवड कमी करता येइल का ?
ही प्रेरणा होती !
प्रस्तावित अर्ज सुविधा पध्दति

  1. विद्यार्थी एका बैठकीत किंवा अनेकदा,हव्या तितक्या महाविद्यालयांची अर्ज करण्यासाठी निवड करु शकतो.
  2. विद्यार्थ्याला माध्यमिक शालांत परीक्षेच्या बैठक क्रमांकावर आधारित नोंदणी केल्यानंतर एक लॅाग-इन व पासवर्ड मिळतो.
  3. विद्यार्थी यासाठी स्वत:चे वा शेजाऱ्याचे घर,आपली शाळा ,सायबर कॅफे इ. इंटरनेटची सोय असलेली कोणतीही जागा वापरु शकतो.
  4. विद्यार्थ्याला ,स्वत:ची रुपरेखा वा माहिती दर्शविणारा अर्ज फक्त एकदाच भरावा लागेल.यादीमध्यें सर्व महाविद्यालये समाविष्ट असतील.यादीमधुन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयाची निवड करेल. इच्छित महाविद्यालयाचा अर्ज स्क्रिनवर येइल.उघडता क्षणीच त्यात विद्यार्थ्याची आकडेवारी भरली जाईल.विद्यार्थ्याने फक्त ,(तेही गरज असल्यास), अर्जात आवश्यक ते थोडे-फार बदल करायचे व बटन दाबुन अर्ज पुर्ण करायचा.ही रुपरेखा व इतर कोणत्याही महाविद्यालयाचे प्रलबिंत अर्ज , विद्यार्थ्यासाठी,त्याच्या सर्व्हर वरील जागेत साठवले जातील.
  5. ही अर्जपध्दती पर्यायी/वैकल्पिक असुन सक्तीची नाही.
  6. महाविद्यालयांसाठी मात्र आॅनलाइन अर्ज स्विकृती व त्याचा विचार इतर लेखी अर्जाप्रमाणे करणे हे अनिवार्य आहे.
  7. प्रत्यक्ष लेखी अर्ज व आॅनलाइन अर्ज यांचे अस्तित्व समांतर असेल.
  8. आॅनलाइन अर्ज सुविधेसाठी ही पध्दती आहे.
  9. या पध्दतीमध्यें 'अर्ज प्रक्रिया फी' मोबाइल वर भरता येते.
  10. 'आॅन लाइन' पैसे भरल्यावर,विद्यार्थ्याला,तत्काळ पोच मिळते(कितीही अर्ज असले तरी).ही पोच उपसंचालकाच्या डाटाबेसवरील ई-मेलच्या स्वरुपात असेल,तसेच मोबाइल वरिल SMS च्या स्वरुपात ही असेल.उदा.' अमुक अमुक महाविद्यालयांला(इतर तपशिलांसह)..या विशिष्ठ क्रमांकाचा अर्ज पाठवला.' महाविद्यालयांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल मधें राहते.
  11. अर्ज केल्याची नोंद,ज्या महाविद्यालयाकडे अर्ज केला असेल तेथे,उपसंचालकाच्या नोंदणीत व स्वत: विद्यार्थ्याच्या ई-मेल मधें राहते.
  12. महाविद्यालयांना लेखी अर्ज स्विकारण्याची देखील मुभा आहेच.
  13. महाविद्यालये लेखी तसेच आॅनलाइन अर्ज एकत्र करतील. अर्जाच्या प्रतिलिपी (दुसऱ्या/डबल प्रति)बाजुला काढुन गुणवत्ता यादी तयार करतील.
  14. प्रवेश प्रक्रियेचे नियम या पध्दतीमुळे बदलेले नाहीत.
  15. माननीय उच्च न्यायालय व आवश्यक सरकारी नियमांनुसार,महाविद्यालयांना प्रवेश अर्ज विषयक स्वायतत्ता पुर्वीप्रमाणेच अबाधित राहिल.
  16. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्या,त्यांचे बैठक क्रमांक,गुण व इतर तपशील,माध्यमिक शालांत परीक्षा मंडाळाच्या नोंदीतून उपलब्ध करुन देतील.
  17. आॅनलाइन अर्ज सुविधा व अर्जाची फी म्हणून किरकोळ रु. ५(रुपये फक्त पाच)सेवाखर्च आकारला जाईल.हा प्रवास खर्चापेक्षा निश्चितच स्वस्त पडेल.लोकांचा बराचसा वेळ वाचेल तो वेगळाच!
  18. विद्यार्थ्यी उत्तीर्ण झालेल्या शाळेत हेल्प लाईन
  19. ई-मेल वर हेल्प लाईन.
  20. विभागाकडून फोन,कार्यालये तसेच महाविद्यालयात हेल्प लाईन

पध्दतीचे फायदे:

  1. प्रवासावाचून कुठल्याही महाविद्यालयात अर्ज करण्याची सोय.
  2. २४ तास सुगमता(म्हणजेच नोकरी करणाऱ्यांची रजा वाया जाणार नाही!).